Online Exam Scam: कॉपी बहाद्दरांचा 'माझा' कडून पर्दाफाश, विद्यार्थ्यांनी पैसे देऊन उत्तरं मिळवली
गेली दोन वर्ष कोरोनामुळे ऑनलाईन परीक्षा सुरु आहेत.. मात्र, या परीक्षांमध्ये मिळणारे गुण कितपत ग्राह्य धरायचे हा प्रश्न उपस्थित झालाय... त्याचं कारण म्हणजे कॉपी बहाद्दर... पदवी, पदव्युत्तर ऑनलाइन परीक्षांमध्ये सर्रास कॉपी करणाऱ्यांचा पर्दाफाश एबीपी माझाने केलाय.. इंजिनिअरिंग असो किंवा मग लॉची परीक्षा बीकॉम असूद्यात किंवा बीएससी जवळपास सर्वच अभ्यासक्रमांमध्ये पैसे मोजून ऑनलाईन परीक्षा मध्ये कॉपी बहाद्दर चांगल्या मार्काने पास होतायत..