Onion Export Issue : बंगळूरुच्या कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क हटवले, महाराष्ट्राचं काय?

Continues below advertisement

Onion Export Ban News : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) चिंतेत आहे. कारण कांद्यावरील निर्यातबंदी (Onion Export Ban) हटवून देखील कांद्याचे दर वाढत नाहीत. याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) बसत आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं केलेल्या कांदा निर्यातबंदीचा मोठा फटका बसला आहे. कांदा निर्यात बंदीमुळं परकीय चलनात 649 कोटी रुपयांची तूट आली आहे. तर 8 लाख 17 हजार 530 मेट्रिक टन कांद्याची निर्यात कमी झाली आहे.

कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारकडून नेहमीच धरसोडीचे धोरण अवलंबले जात आहे. याचा परिणाम देशाच्या परकीय चलणावर होत आहे. गेल्या आर्थिक वर्षात परकीय चलनात 649 कोटी रुपयांची तूट तर 8 लाख 17 हजार 530 मेट्रिक टन कांद्याची निर्यात कमी झाल्याची बाब अपेडाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. सन 2023 ते 24  या आर्थिक वर्षामध्ये 17 लाख 7 हजार 998 मेट्रिक टन कांदा निर्यात झाला आहे. यातून 3 हजार 874 कोटी रुपयांचे चलन मिळाले आहे. तर सन 2022 ते 23 या आर्थिक वर्षामध्ये 25 लाख 25 हजार 258  मेट्रिक टन कांदा निर्यात झाला आहे. यातून 4 हजार 522 कोटी रुपयांचे चलन मिळाले आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram