Nitin Gadkari Threat Case : आरोपी शाकीर लष्कर - ए -तोयबाशी संबंध, धमकी प्रकरणाचे धागेदारे सीमेपलीकडे
abp majha web team
Updated at:
13 Apr 2023 02:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनितीन गडकरी धमकी प्रकरणातील आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीरवर यूएपीए कायद्याअंतर्गत देखील गुन्हे दाखल होणार आहेत. याचं कारण म्हणजे शाकीर हा पीएफआय संघटना, लष्कर-ए-तोयबा आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांशी संपर्कात असायचा.. आणखी महत्त्वाचं म्हणजे या या संपूर्ण प्रकरणाचे काही धागेदोरे सीमेपलीकडे ही जात आहेत.. आणि म्हणूनच नागपूर पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेष कुमार यांनी एबीपी माझाला ही एक्सक्लुझिव्ह माहिती दिली.