NEET UG Exam Result 2024 : नीट परिक्षेच्या निकालात गोंधळ, नेमकं प्रकरण काय?

Continues below advertisement

NEET UG Exam Result 2024 : नीट परिक्षेच्या निकालात गोंधळ, नेमकं प्रकरण काय?

NEET UG Result 2024 Controversy Explained : गेल्या काही दिवसांपासून देशात नीटच्या परीक्षेवरून विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये असंतोषाचं वातावरण असल्याचं दिसतंय. या परीक्षेत मोठा गैरप्रकार झाल्याचा विद्यार्थी आणि पालकांचा आरोप आहे. विद्यार्थ्यांच्या आक्षेपावर एनटीएला समाधानकारक उत्तर देता आलं नसल्याचं स्पष्ट दिसतंय. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं असून त्यावर 8 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. 

नीटच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळालेत. यावर आता केंद्रीय उच्चशिक्षण सचिवांनी स्पष्टीकरण दिलं आहे, यावर एक कमिटी स्थापन करुन याची चौकशी करणार असल्याचं केंद्रीय उच्चशिक्षण सचिवांनी म्हटलंय. काही परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याचं त्यांनी मान्यही केलंय. तर ज्या ठिकाणी गोंधळ झाला तिथे आम्ही पुन्हा परीक्षा घेतल्याचं केंद्रीय उच्चशिक्षण सचिवांनी म्हटलंय. परीक्षेला बसलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी 6 केंद्रावरील 1600 विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि त्याची कमिटीद्वारे चौकशी होईल असं सांगण्यात येतंय.  

नीट परीक्षेत गैरप्रकार घडल्याचा आरोप झाल्यानंतर नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएने पत्रकार परिषद घेऊन हे आरोप फेटाळून लावलेत . मात्र देशातील बहुसंख्य विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांनी एनटीएचा हा दावा म्हणजे धूळफेक असल्याचं सांगितलंय. नीट परीक्षेत गैरव्यवहार फक्त काही मोजक्या केंद्रांवर नाही तर देशपातळीवर केला गेल्याचा त्यांचा आरोप असून ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी त्यांनी केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram