Zero Hour Guest Center With Ratan Sharda : अजित पवारांना सोबत घेतल्यतानं भाजपची ब्रँड व्हॅल्यू घसरली, संघाचा आरोप

Continues below advertisement

Zero Hour Guest Center With Ratan Sharda : अजित पवारांना सोबत घेतल्यतानं भाजपची ब्रँड व्हॅल्यू घसरली, संघाचा आरोप संघाचा आरोप ज्या राष्ट्रवादीला घेऊन आज भाजपवर एवढी टीका झाली, त्यांच्या दारी मात्र सस्पेन्स सुरु आहे तो राज्यसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवाराबद्दल .  अर्ज भरण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार आजही जाहीर केला नाही. खरं तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जेव्हा आज पत्रकार परिषद बोलावली तेव्हा ते उमेदवार घोषित करतील असंच वाटलं होतं, मात्र त्यांनी घोषणा टाळली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी पार्थ पवार, सुनेत्रा पवार, बाबा सिद्दिकी, समीर भुजबळ, आनंद परांजपे यांची नावं चर्चेत आहेत ... सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवावं आणि त्यांना थेट राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यमंत्री करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट करत होता. खरं तर २० फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यसभेवर कोणाला पाठवायचं हा पेच उभा राहिला होता.. पण तेव्हा प्रफुल्ल पटेल यांनाच आधीच्या कार्यकाळातील ४ वर्ष बाकी असताना राजीनामा द्यायला लावला होता आणि पुन्हा राज्यसभेवर पाठवलं होतं.. ३ महिन्यानंतर त्यांच्या त्यावेळी सोडलेल्या जागेसाठी तेच धर्मसंकट अजित पवारांसमोर पुन्हा उभा राहिलं आहे. घराणेशाहीचा आरोप स्वीकारुन, अनेक ज्येष्ठ नेत्यांची नाराजी ओढवून अजितदादा घरातलाच उमेदवार देतात की एखादा मंझा हुआ पक्षातील नेता समोर करतात कि नवा ताज्या दमाचा खेळाडू राज्यसभेवर पाठवतात .... आज नाहीतरी उद्या मात्र हे समोर कळेलच. पत्रकार परिषदेत सुनील तटकरे राज्यसभेबाबत तर बोललेलेच पण आर एस एसच्या ऑर्गनायझरने केलेल्या टीकेबाबत काय म्हणाले ते पाहुयात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram