Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?

Continues below advertisement

Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?

Maharashtra winter session : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सोमवारपासून म्हणजेच 8 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. अधिवेशनामुळे संपूर्ण सचिवालयाचे कामकाज मुंबईहून नागपूरला हलवण्यात आले असून, संबंधित विभागांनी बहुतेक तयारी पूर्ण केली आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली आहे की, जिथं दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अधिकृत विरोधी पक्षनेता (Leader of the Opposition - LoP) नाही.

विधानसभा: 

नोव्हेंबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर, कोणत्याही विरोधी पक्षाला एकूण जागांपैकी किमान 10 टक्के जागा मिळाल्या नाहीत. 288 सदस्यांच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करण्यासाठी किमान 29 आमदार असणे आवश्यक आहे. महाविकास आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाकडे (काँग्रेस, शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)) स्वतंत्रपणे इतके संख्याबळ नसल्यामुळे, हे पद रिक्त आहे.

विधान परिषद: 

विधान परिषदेमध्येही 29 ऑगस्ट 2025 पासून विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे, कारण तेथील नियमांनुसार कोणत्याही विरोधी पक्षाकडे आवश्यक 10 टक्के संख्याबळ नाही. यापूर्वीच्या सहा दशकांच्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात विधानसभेत नेहमीच विरोधी पक्षनेता होता, परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे दोन्ही सभागृहांना एकाच वेळी विरोधी पक्षनेता मिळालेला नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola