Chandrapur : ताडोबा अतिशय चांगली जागा असल्याने वारंवार येतोय, सचिन तेंडुलकरची Tadoba सफर
सारंग पांडे, एबीपी माझा
Updated at:
05 Sep 2021 08:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChandrapur : ताडोबा अतिशय चांगली जागा असल्याने वारंवार येतोय अशी प्रतिक्रिया ताडोबा सफारीसाठी आलेल्या सचिन तेंडुलकर यांनी दिली आहे. सचिन तेंडुलकर हे पत्नी अंजली आणि मित्रांसोबत ताडोबा सफारीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले आहे. विशेष म्हणजे याच वर्षी सचिन तेंडुलकर जानेवारी महिण्यात ताडोबा सफारीसाठी आले होते आणि ते आठच महिन्यांनी पुन्हा ताडोबा सफारीसाठी आल्याने ताडोबा प्रशासन अतिशय आनंदी आहे. आज दुपारी सचिन तेंडुलकर यांनी शिरकाडा गेट वरून टायगर सफारी केली. सचिन तेंडुलकर यांची ही तिसरी सफारी केली असून काल दुपारी मदनापूर तर आज सकाळी अलिझंझा गेट वरून त्यांनी ताडोबा सफारी केली आहे.