Mumbai Superfast News : मुंबईतील सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : Vidhan Sabha

Continues below advertisement

विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने  पालघरचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा नॉटरिचेबल, वनगा यांचे दोन्ही फोन बंद, कुटुंबीयांसह पोलीस प्रशासनाकडून वनगांचा शोध सुरू. 
 मुख्यमंत्री शिंदेंचा वनगा यांच्या पत्नीशी फोनवरुन संवाद, विधानपरिषदेत श्रीनिवास वनगा यांना संधी देणार. 
मुंबईत ठाकरे गट 36 पैकी 22 जागा लढवणार तर काँग्रेस दहा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तीन आणि सपा एक जागा लढवणार.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही महायुतीत जागावाटपाचा गोंधळ, शिवसेनेच्या कोट्यातील धारावीची जागा आरपीआयला मात्र धारावीत आरपीआयकडून उमेदवीर अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती. 
नवी मुंबईत भाजप उमेदवार महेश बालदी यांचा उरण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज, यावेळी नितीन गडकरींसह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेत बंडखोरी, स्वीकृती शर्मांचा उमेदवारी अर्ज दाखल, मुरजी पटेल, ऋतुजा लटके विरुद्ध स्वीकृती शर्मा अशी लढत होणार. 
दिंडोशी विधानसभेत शिवसेनेकडून संजय निरुपम यांचा उमेदवारी अर्ज दाखल, जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला, काल शिवसैनिकांनी केला होता निरुपम यांच्या उमेदवारीला विरोध. 
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बोईसर विधानसभेत ट्विस्ट, शिवसेनेकडून विलास तरे यांना उमेदवारी दिल्यानं नाराज असलेल्या जगदीश धोडी यांच्याकडूनही अर्ज दाखल. 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळले.
बहुतेक कर्मचारी हे मतदान किंवा मतमोजणी दिवशीच कार्यरत असणार. निवडणूक शाखेची माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram