Devendra Fadnavis : चार वेळा चौकशीला बोलावूनही देवेंद्र फडणवीस हजर नाही : मुंबई सायबर सेल
फोन टॅपिंग प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मला सायबर सेलनं अद्याप साक्षीसाठी बोलावलं नाही असं ते म्हणाले आहेत. सायबर सेलनं एक प्रश्नावली पाठवली, त्यानंतर एक पत्र आलं असं फडणवीस म्हणाले. कोर्टातील प्रकरण संपल्यानंतर उत्तर देईन असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.