Mumbai Auto Fare : मुंबईत ऑटो रिक्षा भाडेवाडीची शक्यता; किमान भाडे 26 रूपये करण्याची मागणी

Continues below advertisement

Mumbai Auto Fare : मुंबईत ऑटो रिक्षा भाडेवाडीची शक्यता; किमान भाडे 26 रूपये करण्याची मागणी मुंबईत नजिकच्या काळात रिक्षा भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. रिक्षाचालकांच्या संघटनांनी मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडे म्हणजे एमएमआरटीएकडे  भाडेवाढीची मागणी केली आहे. सध्या मुंबईत दीड किलोमीटर अंतरासाठी रिक्षाचं २३ रुपये भाडं आकारण्यात येतं. त्यात दोन ते तीन रुपयांनी वाढ करण्याची मागणी मुंबई रिक्षामेन्स युनियनकडून करण्यात आली आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एमएमआरटीए अधिकाऱ्यांची भेट घेऊन, त्यांच्यासमोर आपल्या मागण्यांची यादी ठेवली. यासंदर्भात येत्या दोन दिवसांत पुन्हा बैठक घेऊन भाडेवाढीवर निर्णय घेतला जाईल असं युनियनच्या वतीनं सांगण्यात आलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram