Mulund Hit And Run: मुलुंड गणेश मंडळातील दोघांना भरधाव कारने उडवलं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMulund Hit And Run: मुलुंड गणेश मंडळातील दोघांना भरधाव कारने उडवलं
मुलुंड मध्ये पहाटे चार वाजता एक बीएमडबल्यू कार ने रस्त्यावर बॅनर लावणारया दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली आणि पसार झाला आहे. यात एक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून दुसऱ्या ची परिस्थिती गंभीर आहे. मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान मुलुंड च्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवर जवळ रस्त्यावर शिडी लावून बॅनर लावत होते. अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्लू कार कँपस हॉटेल कडून मुलुंड पूर्व ते वेस्ट च्या ब्रिज कडे जात असतांना यादोघांना शिडीसह जोरदार धडक दिली. धडक देऊन हा चालक थांबला देखिल नाही, मुलुंड पश्चिमेकडे भरधाव वेगाने पळून गेला. यात प्रीतम थोरात याचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटील ची प्रकृती गंभीर आहे, घटना स्थळी पोलीस दाखल झाले असून कार चा आणि चालकाचा शोध सुरू आहे.