Marathwada : अनौपचारिक परीक्षेला गुरुजीच गैरहजर, प्रशासनाच्या चांगल्या उपक्रमाचा फज्जा
abp majha web team
Updated at:
30 Jul 2023 01:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती संभाजीनगरमध्ये आज शिक्षकांची एक अनौपचारिक परीक्षा घेण्यात आली. तुमचा विश्वास बसणार नाही, पण या परीक्षेला ९९ टक्के शिक्षकांनी दांडी मारली. जेमतेम १ टक्का शिक्षकांची उपस्थितीतून शिक्षक किती उदासीन आहेत, हे स्पष्ट झालं. मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालयाने ही परीक्षा घेतली. जिल्हा परिषद शाळेतील गुरुजींचा शिक्षणाचा आणि शिकवण्याचा स्तर वाढवा यासाठी ही परीक्षा होती. छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण मिळून 8 हजारांवर शिक्षक आहेत. प्रत्यक्षात अवघे 977 गुरुजी परीक्षेला हजर होते. निवृत्त झालेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.