ABP Majha Headlines : 07 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

वायकरांच्या मेहुण्याने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन, मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाच्या
ऑपरेटरवर गुन्हा दाखल,दोघांवर अटकेची टांगती तलवार

ईव्हीएम आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही, ईव्हीएमला ओटीपी लागतच नाही, निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण.

ईव्हीएमवरून आरोप म्हणजे विरोधकांचा रडीचा डाव, मतमोजणी सुरू असताना तिथं हजारो पोलीस तैनात होते, रवींद्र वायकर यांनी फेटाळले आरोप 
((विरोधकांचा रडीचा डाव-वायकर))

ईव्हीएम हॅक होण्याचा धोका कायम, त्यांचा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे, टेस्लाचा सीईओ एलन मस्कचं मत, तर भारतीय ईव्हीएम हॅक करणं अशक्य, माजी केंद्रीय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांचं प्रत्युत्तर 
((ईव्हीएम हॅक करणं शक्य-एलन मस्क))

पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, महायुतीचे तीनही महत्वाचे नेते दिल्लीला जाणार, राष्ट्रवादीला हवी आहेत एक कॅबिनेट दोन राज्यमंत्रिपदं.

राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रिपद मलाच मिळणार, सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा सुरू असताना प्रफुल पटेल यांचं मोठं वक्तव्य
((मंत्रिपदाच मलाच मिळणार-पटेल))

आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबाचं सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर, पंकजांच्या पराभवामुळे आत्महत्या केल्याची चर्चा
((...आणि पंकजांना अश्रू अनावर))

भाजपच्या मदन भोसलेंविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल, किसनवीर साखर कारखान्यात घोटाळा केल्याचा ठपका, बँक ऑफ इंडियाचे ६० कोटी बुडवल्याचा आरोप.

सलमान खानला युट्यूबवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणाला राजस्थानमधून अटक, बिष्णोई गँगशी संबधित बनवारीलाल गुज्जरला मुंबई गुन्हे शाखेनं ठोकल्या बेड्या 

सातारा जिल्ह्यातलं बलकवडी धरण कोरडंठाक, पुरेसा पाऊस न झाल्यानं धरणातला पाणीसाठी घटला, २४ वर्षांनी २ मंदिरांचे अवशेष दिसू लागले

विनापरवानगी रस्ते खोदल्यास थेट गुन्हा दाखल होणार, नाशिक महापालिकेच्या बांधकाम विभागाचा इशारा, २५ जूनपर्यंत खोदलेले खड्डे बुजवण्याच्या सूचना

एक जूनपासून मुलींना राज्यात मोफत शिक्षण देण्याची चंद्रकांत पाटलांची घोषणा हवेतच विरली,
जून महिना सरला तरी अंमलबजावणी नाहीच

शिर्डीतील साईबाबांना ४३ लाखांचा सोन्याचा मुकूट अर्पण, देणगीदाराकडून नाव जाहीर न करण्याची संस्थानाला विनंती 
((साईंच्या चरणी ४३ लाखांचा मुकुट))

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram