Majha Goan Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 8 AM : 21 Dec 2024 : Maharashtra News : ABP Majha

Continues below advertisement

Majha Goan Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 8 AM : 21 Dec 2024 : Maharashtra News : ABP Majha

भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्षांची आज नागपुरात बैठक, नवीन सरकार आल्यानंतर भाजपची पहिली पक्षीय बैठक, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन.

रोहित पवारांनी घेतली अजित पवारंची भेट, रोहित पवारांकडून अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा, रोहित पवारांकडून 'एक्स'वर भेटीचे फोटो पोस्ट.

आदित्य ठाकरेंनी घेतली प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांची भेट, फडणवीसांची भेट घेतल्यानंतर झाली भेट.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून  सर्वपक्षीय आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण. मुख्यमंत्र्यांसहीत महायुतीमधील अनेक आमदारांनी लावली उपस्थिती

युगेंद्र पवारांनी मत पडताळणीचा दाखल केलेला अर्ज घेतला परत. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांकडून पराभूत झाल्यानंतर मत पडताळणीसाठी युगेंद्र पवारांनी केला होता अर्ज. 

मंत्रिपद मिळाल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात, यावेळी कार्यकर्त्यांकडून गुलाबरावांचं जल्लोषात स्वागत.

शाहांनी आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याचे इंदापुरात पडसाद.अमित शाहांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला.बस स्थानकासमोर रास्तारोको आंदोलन.

अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा कणकवलीत ठाकरे गटाकडून निषेध. अमित शाहांच्या विरोधात घोषणाबाजी. 

गोंदियाच्या प्रशासकीय इमारतीसमोर आंबेडकरी विचारांच्या विविध संघटनांतर्फे अमित शहांच्या विरोधात जन आक्रोश आंदोलन. अमित शाहांच्या राजीनाम्याचीही केली मागणी.

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram