Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 6:30 AM : 2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 6:30 AM : 2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
काँग्रेस नेते सुनील केदार यंदा विधानसभा निवडणूक लढवता येणार का असा प्रश्न, केदार यांनी नागपूरच्या सत्र न्यायालयात शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात आवश्यक अर्ज केला नसल्याने प्रश्न उरस्थित.
कृषी विभागातील जेडीआय आस्थापना पद नियम आणि शासन अद्यादेश डावलून भरण्यात आल्यान कृषी विभागातील लिपिकांनी पुकारला संप. कृषी विभागातील सर्व कामे खोळंबली.
रोहित पवारांच्या कंपनीने केलेल्या फसवणुकीविरोधात अहमदनगरच्या कर्जत तहसीलसमोर शेतकऱ्याचं उपोषण, आपली जमीन बारामती अॅग्रो कंपनीला विकली, मात्र कुठलेही पैसे न देता जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा शेतकऱ्याचा आरोप.
सरकारने मागण्या मान्य न केल्यास 1 नोव्हेंबरपासून राज्यभरात धान्य पुरवठा बंद करणार. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारक महासंघाचा निर्णय.
शालेय पोषण आहारातून ३८ विद्यार्थ्यांना विषबाधा, ठाण्याच्या कळव्यातील सह्याद्री शाळेतील प्रकार, शासनाकडून आलेल्या शालेय पोषण आहारातून विषबाधा, विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर, कळवा रुग्णालयाची माहिती.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळील निळगव्हाण येथे 5.78 हेक्टर क्षेत्रात डाळिंब इस्टेट स्थापन करणार, मंत्रिमंडळानं दिली मंजुरी, त्यासाठी 53 कोटी निधीची तरतूद, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती.
आईची हत्या करणाऱ्या मुलाची फाशी हायकोर्टाकडून कायम, 28 ऑगस्ट 2017 मध्ये कोल्हापुरातील माकडवाला वसाहतीतील घटना, आरोपी समाजात राहण्यास योग्य नाही, कोर्टाचा निर्णय.