Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 12 June 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील अनेक भागांमध्ये आज पावसाचा अंदाज, हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट तर विदर्भ आणि मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी.
नाशिकच्या चांदवड इथे आसरखेडे गावात ढगफुटीसदृश पाऊस, द्राक्ष बागांना पावसामुळे नदीचं स्वरुप, गेल्या दोन दिवसांपासून चांदवडमध्ये पाऊस सुरु.
हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस, शहरातील मस्तानशहा नगरमध्ये नाल्याचं पाणी घरात शिरल्यानं संसारोपयोगी साहित्याचं नुकसान, नालेसफाईच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित.
यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस, कळंब, आर्णी, दारव्हासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, खरीब हंगामातील पिकांच्या लागवडीला सुरुवात.
नाशिकच्या नांदगाव तालुक्यात मुसळधार पाऊस, नदी नाले भरुन वाहिले. खरीपाच्या पेरणीचा मार्ग मोकळा, खादगाव इथे वीज अंगावर पडून तरुणाचा मृत्यू.
बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, पावसामुळे नांदुरा - जळगाव जामोद मार्गावर मोठं झाड कोसळल्यानं काही काळ वाहतूक ठप्प तर आसलगाव नदीला पूर.
मराठवाड्याच्या धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील रामलिंग धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित. पर्यटकांची पावले रामलिंग धबधब्याकडे.
महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस. अचानक सुरू झालेल्या पावसानं पर्यटकांची उडाली तारांबळ.