Mahendra Thorve vs Dada Bhuse : घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सदस्यांना दाखवा, विरोधकांची मागणी
Continues below advertisement
Shinde Group MLA Fight : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Budget Session 2024) शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. विधीमंडळात शिंदे गटाच्या आमदारांमध्ये वाद (Shiv Sena Shinde Group MLA Fight) झाला. घडल्या प्रकारावर मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. दादा भुसे यांनी महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्यासोबत बाचाबाचीच्या घटनेचं खंडन केलं आहे. असं काहीही झालं नसल्याचं दादा भुसे यांनी म्हटलं आहे. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात वाद झाला. यामुळे विधींमंडळातील वातावरण तापल्याचं चित्र होतं. दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे यांनी दादा भुसेंसोबत शाब्दिक चकमक झाल्याचं स्पष्ट सांगितलं आहे.
Continues below advertisement