Prakash Ambedkar : मविआच्या बैठकीसाठी प्रकाश आंबेडकर फोर सिझन्स हॉटेलमध्ये दाखल

Prakash Ambedkar : मविआच्या बैठकीसाठी प्रकाश आंबेडकर फोर सिझन्स हॉटेलमध्ये दाखल.

लोकसभा निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. राज्यात दोन प्रमुख आघाड्या या एकमेकांविरोधात लढण्यास तयार आहेत. सत्ताधारी भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट यांची महायुती विरुद्ध शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी अशी ही लढत होणार आहे. 

महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्याचे बोलले जात आहे. यासाठी आज मुंबईतील फोर सिझन्स हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक आहे. तर महायुतीच्या जागा वाटपाची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बीकेसी वर्ल्ड सेंटर येथे बैठक होत आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीला आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित झाले आहेत. प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहाणार की नाही, याबद्दल राजकीय वर्तूळात सकाळपासून चर्चा होत आहे. अखेर प्रकाश आंबेडकर हे बैठकीसाठी हॉटेल फोर सिझन्स येथे दाखल झाले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola