Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 27 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 27 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी उमेदवार यादी आज जाहीर होणार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दुपारी पत्रकार परिषद घेऊन यादी जाहीर करणार.
बाळासाहेब थोरातांनी घेतली शरद पवारांची भेट, समन्वयक म्हणून थोरातांकडून शरद पवारांसोबत उर्वरित जागावाटपासंदर्भात चर्चा.
पुण्यात आज महाविकास आघाडीची समन्वयक बैठक, अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित, विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन, पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात समन्वय समिती करणार काम.
महायुतीचा अंतिम फॉर्म्युला आजच जाहीर होणार, संध्याकाळी फडणवीसांच्या सागर निवासस्थानी बैठकीचं आयोजन, मुंबईसह सर्व जागांचा तिढा सुटणार
राष्ट्रवादीची 4 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, गेवराईतून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील, निफाडमधून दिलीप बनकर आणि पारनेरमध्ये काशिनाथ दातेंना संधी, 
राष्ट्रवादीत दहा जागांवरुन तिढा कायम, आतापर्यंत एकूण 49 जागांवर उमेदारांची घोषणा, महायुतीत राष्ट्रवादीला 60 जागा सुटण्याची शक्यता होती, मात्र अद्याप 10 जागांवर तिढा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram