Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP Majha
सरपंच देशमुखांच्या हत्येला पन्नास दिवस पूर्ण, आरोपी कृष्णा आंधळेही पन्नास दिवसांपासून फरार. धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आग्रही.
पक्ष आणि अजितदादांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईन', देवगिरीवरील आमदारांच्या बैठकीत धनंजय मुंडेंनी स्पष्ट केली भूमिका, काही जण वैयक्तिक राग मनात ठेवून आरोप करत असल्याचा मुंडेंचा दावा
धनंजय देशमुख आज सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेणार, अजित पवारांनी निरोप पाठवला तर त्यांची भेट घेऊ, धनंजय देशमुखांची माहिती, आरोपी फासावर लटकेपर्यंत लढा देणार, देशमुखांचा निर्धार.
कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होईल किंवा पक्षाला अडचण निर्माण होईल अशी कृत्ये टाळा, देवगिरीवरील बैठकीत अजित पवारांच्या आमदारांना सूचना, पालिका निवडणुकांच्या तोंडावर जास्तीत जास्त वेळ मतदारसंघात देण्याच्याही सूचना.
डीबीटीच्या धोरणाला फाटा देत शेतकऱ्यांना महाग दरात वस्तू खरेदी करून पुरवल्याच्या प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप, धनंजय मुंडे कृषिमंत्री असतानाचं प्रकरण, उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाकडून राज्य सरकारला तीन आठवड्यांची मुदत.
पालकमंत्रिपदासंदर्भात अजित पवारांच्या दालनात बैठक, मंत्री गोगावले, आमदार दळवी आणि थोरवेंनी घेतली अजित पवारांची भेट, रायगडच्या पालकमंत्रिपदावर मंत्री भरत गोगावले ठाम.
भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच पक्षाकडून कारवाईची शक्यता.पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे कारवाई करणार असल्याची माहिती.
काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मंत्री पंकजा मुंडेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. सदिच्छा भेट असल्याची माहिती.
बाकी सगळे निकाल लागतात, मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निर्णयाला उशीर का, एकनाथ खडसेंचा सवाल, विशेष वकीलाची नेमणूक करुन सरकारने याकडे लक्ष द्याव, खडसेंनी केली मागणी.