Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 13 जुलै 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 13 जुलै 2024 : ABP Majha
दिवसभराच्या महत्वाच्या बातम्या :
सरकारच्या हातात आजची रात्र, आमच्या ९ मागण्या मान्य करा, अन्यथा 20 तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 29 हजार 400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन, मुंबई आणि महाराष्ट्राला जगातलं मोठं आर्थिक केंद्र बनवणार, मोदींचा विश्वास
फेक नरेटिव्ह पसरवणारे विकासकामांचे शत्रू, देशाचा विकास थांबवण्याची विरोधकांची नीती, मुंबईतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
विधान परिषद निवडणुकीत २ एकर जमीन आणि २० ते २५ कोटींचा सौदा झाल्याचा संजय राऊतांचा आरोप...तर हार झाल्यानंत सत्तेचा आणि पैशांचा वापर झाल्याची टीका, मुनगंटीवारांचा पलटवार...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचंच एक मत फुटलं...विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा शेकापच्या जयंत पाटलांचा आरोप... पण पवार आणि मविआसोबत राहणार असल्याचंही केलं स्पष्ट...