Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 Oct 2024

Continues below advertisement

निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून निर्णयांचा धडाका, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ८० महत्त्वाचे निर्णय. 

नॉन क्रिमिलेअरची मर्यादा वाढवण्यासंदर्भात राज्य सरकारची केंद्र सरकारला शिफारस. मर्यादा आठ लाखावरून पंधरा लाख करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय.

शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी, वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळाची स्थापना करण्यात येणार. इतर मागास बहुजन कल्याण महामंडळ स्थापन करणार. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. 

जालना-नांदेड महामार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी, हा महामार्ग समृद्धी महामार्गाला जोडला जाणार. 

राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू केली जाणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय.

शिंदे सरकारचा आणखी एक महत्वाचा निर्णय, पत्रकारांसाठी आणि वृतपत्र विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी. 

रमाबाई आंबेडकर मधील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी खासगी जमिनीचा मोबदला देणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय.

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा राज्य सरकारचा मार्ग तूर्तास मोकळा, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेविरोधातली याचिका चार आठवड्यांसाठी तहकूब. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram