Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha

Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha

काँग्रेस (Congress) पक्षाला सातत्यानं धक्के बसत आहेत. अनेक नेते पदाधिकारी पक्षाला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. दरम्यान, आज काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi)  हे मुंबईत असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे (Vijay Ambhore) हे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. थोड्याच वेळात मुंबईतील मलबार हील येथे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

विजय अंभोरे यांनी गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा व काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु होत्या. अखेर आज ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. हा काँग्रेस पक्षासाठी बुलढाणा जिल्ह्यात मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्या स्वजिल्ह्यातच मोठा धक्का बसला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी काही दिवसापूर्वीच प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर लगेच विजय अंभोरे यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola