Maharashtra SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा : मुंबई सुपरफास्ट : 20 June 2024 :ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा : मुंबई सुपरफास्ट : 20 June 2024 :ABP Majha
सिंधुदुर्गपासून ठाण्यापर्यंत पुढील चार दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी, हवामान विभागाची माहिती, चार दिवस मुंबईसह किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज.
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईत पहाटेपासूनच रिमझिम पाऊस.
पालघर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस, आज आणि उद्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज.
पालघरमधील पंचाळी रमाईनगरमध्ये साचलं पाणी, नियोजनाअभावी पाणी साचल्याचा नागरिकांचा आरोप,
मुसळधार पावसामुळे पालघरमधील अनेक भागातील ओढ्यांना पूर, ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्यानं केळवे रोड स्थानकाकडे जाणारा रस्ता बंद
पालघर जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस, वाणगाव रानशेत रस्त्यावर झाड कोसळल्याने रस्ता बंद
मुसळधार पावसामुळं डोंबिवलीतल्या सागर्ली परिसरात साचलं पाणी, चाळींमध्येही पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल, रस्त्यांना नदीचं स्वरुप .