ABP Majha Headlines : 12 AM : 30 June : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

रोहितसेनेने बार्बाडोसच्या मैदानात थरारक मॅचमध्ये बाजी मारली आणि टी-ट्वेन्टी विश्वविजेतेपदाचा मान मिळवला. क्लासेनच्या फटकेबाजीमुळे एकेवेळी सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने २४ चेंडूंत २६ धावा असा झुकला होता. मात्र पंड्याने क्लासेनचा काटा दूर केला आणि दबावाच्या क्षणी सूत्र भारताच्या हाती आणून दिली. मग अखेरच्या षटकात सहा चेंडू १६ धावा असं समीकरण होतं. तेव्हा सूर्यकुमारने बाऊंड्रीवर अफलातून कॅच घेत मिलरला तंबूत परतवलं. पुन्हा एकदा हार्दिक पंड्यानेच विकेट काढत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी टॉस जिंकून पहिली फलंदाजी करणाऱ्या भारताने २० षटकांत सात बाद १७६ अशी मजल मारली. स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत शांत राहिलेल्या विराटच्या बॅटने पाणी दाखवलं आणि ५९ चेंडूंत ७६ धावांची खेळी केली. तीन बाद ३४ वरुन अक्षर-विराट जोडीने ७२ ची पार्टनरशिप केल्याने भारताने आव्हानात्मक स्कोर केला. विराटच्या खेळीत सहा चौकार, दोन षटकारांचा समावेश होता. तर, अक्षर पटेलने ३१ चेंडूंत एक चौकार, चार षटकारांसह ४७ आणि शिवम दुबेने १६ चेंडूंत तीन चौकार, एक षटकारासह २७ धावा करत संघाला १७६चा टप्पा गाठून दिला. महेंद्रसिंग धोनीने २००७ मध्ये जिंकलेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपनंतर तब्बल १७ वर्षांनी भारताने टी-ट्वेन्टी विश्वचषकाला गवसणी घातली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram