Sangli Corona Vaccine : लस संपल्याने सांगलीतील लसीकरण थांबलं, उद्या लसीचा साठा मिळण्याची शक्यता
कुलदीप माने, एबीपी माझा
Updated at:
07 Apr 2021 08:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगली जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक आरोग्य केंद्रांमधील लस संपली आहे. मिरज तालुक्यातील नांद्रे गावामधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीचा साठा उपलब्ध संपला असून आरोग्य केंद्राबाहेर लस उपलब्ध नसल्याने लसीकरण होणार नसल्याचे फलक लावण्यात आलेय. सांगली जिल्ह्यात कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असून आज सकाळी फक्त 15 हजार इतकीच लस प्रशासनाकडे उपलब्ध होत्या. जिल्ह्यात आतापर्यंत अडीच लाख लोकांना लस दिली गेली असून राज्य शासनाकडे जिल्हाआरोग्य विभागाने वारंवार पाठपुरावा आणि मागणी करूनही पुरेसा पुरवठा केला गेला नाही.
सांगली जिल्ह्यात मागील 4 दिवसापासून दररोज 15 ते 17 हजारच्या दरम्यान लसीची मागणी होतेय.