MAHARASHTRA Corona Guidelines | अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते 11 वेळेत खुली राहणार
Continues below advertisement
मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावाखाली नागरिक दिवसभर बाहेर फिरत आहेत. त्यामुळे किराणा दुकानांची वेळ सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय काल उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला.
राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, कनफेकशनरी, सर्व खाद्य दुकाने ( चिकन, मटन, पोल्ट्री , फिश सह), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने , पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच सुरू राहतील. मात्र या दुकानांना सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत डोम डिलिव्हरी करता येईल. स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेतील.
Continues below advertisement
Tags :
Covid 19 Coronavirus Corona Guidelines Maharashtra Corona Guidelines Coronavirus Grocery SHopes Vegetable Shops Coronavirus