Sanjay Oak on Maharashtra Lockdown | कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध गरजेचे : डॉ. संजय ओक

Continues below advertisement

मुंबई : महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक हे कडक लॉकडाऊनसाठी आग्रही आहेत. "सध्याच्या कडक निर्बंधबाबत मी समाधानी नाही. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंध आणखी कडक करणं गरजेचं आहे. पूर्वीसारखा कडक लॉकडाऊन व्हावा असंच मला सूचित करायचं आहे, असं वक्तव्य डॉ. संजय ओक यांनी केलं. डॉ. संजय ओक यांनी 'एबीपी माझा'सोबत बातचीत केली. महाराष्ट्रातील सद्यस्थिती, लसीकरण तयारीचं नियोजन, निर्बंधांचा परिणाम याबाबत त्यांनी सरकारला सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं.

डॉ. संजय ओक म्हणाले की, "कालची आकडेवारी कमी झाली. त्यामुळे डाऊनवर्ड ट्रेण्ड सुरु झाला आहे, पण पुढील 10 ते 12 दिवस कडक नियम लागू करावे लागतील. कोरोनाचा हा स्ट्रेन खूप वेगाने पसरणारा आहे. त्यामुळे नियम पाळवे लागणार आहेत. शिवाय काही नियमांबाबत सक्तीही करावी लागेल.

टास्क फोर्सने कोविड अप्रोप्रिएट बेहेवियर आग्रह, रेमडेसिवीर वापराबाबत सूचना, रोरो एक्स्प्रेसची कल्पना दिली. तसंच ऑक्सिजनचा वापर कसा करावा, नियोजन कसं असावं याबाबतच्या सूचनाही दिल्याचं डॉ. संजय ओक यांनी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram