ऑनलाईन शिक्षण सुरु, मात्र स्मार्टफोन, इंटरनेट अभावी हजारो मुलं शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती
ऑनलाईन शिक्षणामुळे हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्यतील शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षणाला 15 जूनपासून सुरुवात झाली आहे. पण अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट, टीव्ही नसल्याचं समोर आलं आहे. इतकंच काय तर मुंबईसारख्या मेट्रो सिटीतील 12 टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही.