Lok Sabha Opinion Poll 2024 : सी व्होटर सर्वे, महायुतीला मोठा फटका? Keshav Upadhye vs Atul Londhe
Continues below advertisement
Lok Sabha Election Opinion Poll 2024 : लोकसभा 2024 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात (Maharashtra) महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सी व्होटरच्या ओपिनियन (ABP & C-Voter Survey ) पोलनुसार महायुतीला 19 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीच्या (maha vikas Aghadi) पारड्यात 26 ते 28 जागा पडण्याचा अंदाज आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ असूनही महायुतीला फारसं यश मिळताना दिसत नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला चांगलं यश मिळणार, असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला 37 टक्के तर महाविकास आघाडीला 41 टक्के मतं मिळू शकतात.
Continues below advertisement