Lockdown 3 | राज्यात काल तीन ते चार लाख लिटर दारु विक्रीचा अंदाज : उत्पादन शुल्क आयुक्त
देशभरात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला कालपासून (4 मे) सुरुवात झाली. यासोबतच ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधील कन्टेंन्मेंट क्षेत्र वगळता मद्यविक्रीला सुरुवात झाली. राज्यात काल तीन ते चार लाख लिटर दारुची विक्री झाल्याचा अंदाज आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. या संदर्भात त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.