Latur Corona Crisis | लातूरच्या रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा; डॉक्टर आणि रुग्णाचे नातेवाईक रस्त्यावर
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर
Updated at:
21 Apr 2021 12:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलातूर : राज्यभरात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून पुरवठा होणार असला तरी बऱ्याच ठिकाणी अजूनही ऑक्सिजनची आणीबाणी निर्माण झाली आहे. ऑक्सिजनअभावी डॉक्टर आणि रुग्णाचे नातेवाईक रस्त्यावर उतरल्याचं चित्र लातूरमध्ये पाहायला मिळालं.
लातूर शहरातील बार्शी रोडवरील आयकॉन हॉस्पिटलचे डॉक्टर प्रमोद घुगे आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी आज सकाळी रस्त्यावर ठिय्या मांडला. जर ऑक्सिजन मिळाले नाहीतर तर रुग्ण सिविल रुग्णालयाला पाठवून मी दवाखाना बंद करतो, अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे. तर रुग्णाचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. रडत रडत त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत.