Kurla Bus Accident Video : निर्लज्जपणाचा कळस, कुर्ला अपघातातील मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या

Continues below advertisement

Kurla Bus Accident Video : निर्लज्जपणाचा कळस, कुर्ला अपघातातील मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या

भरधाव बेस्ट बसखाली चिरडून मुंबईतील कुर्ला परिसरात 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. कुर्ला येथील एलबीएस मार्गावर सोमवारी रात्री हा भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेनंतर संतप्त जमावाने बेस्टचालक संजय मोरे याला मारहाण केली होती. मात्र, काही स्थानिकांनी आणि पोलिसांनी संजय मोरे याला जमावाच्या तावडीतून सोडवले होते. संजय मोरे याला न्यायालयाने 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता त्याच्या चौकशीत एक नवीन माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर बेस्ट प्रशासनाने संजय मोरे याला इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी 10 दिवसांचे रितसर प्रशिक्षण देण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र, पोलिसांच्या चौकशीत संजय मोरे याने वेगळीच माहिती दिली.

माझ्या प्रशिक्षणाचा कालावधी 3 दिवसांचा होता. त्यापैकी पहिले दोन दिवस मला संगणकावर इलेक्ट्रिक बसच्या कार्यप्रणालीबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मला फक्त एकच दिवस इलेक्ट्रिक बस चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. अपघाताच्या दिवशी बस कशी अनियंत्रित झाली, मला माहिती नाही. मी गेल्या 30 वर्षांपासून बस चालवत आहे. या काळात माझ्याबाबत कोणीही तक्रार केलेली नाही. कोणताही अपघात माझ्या हातून झालेला नाही. बस अनियंत्रित कशी झाली, नेमके काय झाले, इलेक्ट्रिक बसमध्ये काही बिघाड होता का, याबाबत संजय मोरे यांना नेमकेपणाने काहीच सांगता आले नाही. त्यामुळे आता पोलिसांनी बेस्ट प्रशासन आणि आरटीओकडून इलेक्ट्रिक बसबाबत अहवाल मागवला आहे. प्राथमिक तपासणीत आरटीओ आणि बेस्ट प्रशासनाने इलेक्ट्रिक बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड आढळून आला नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता नेमकी चूक कोणाची, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram