Sharad Pawar Ajit Pawar : पवारांमध्ये मनोमिलन, बदलणार राजकारण? की भाजपचा डाव, दादांना टार्गेट?

Continues below advertisement

शरद पवारांंच्या वाढदिवशी, अजित पवारांंनी मनोमिलनाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं...त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनीही शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यावं अशी इच्छा बोलून दाखवली.. आणि हाच धागा पकडत रोहित पवारांच्या मातोश्री, सुनंदा पवार सरसावल्यात.. त्यांनी दोन्ही पवारांना एकत्र येण्याची साद घातलीय.. 

दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केलाय...केंद्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी भाजपनं अजित पवारांना टार्गेट दिल्याचं त्यांनी म्हटंलंय. अजित पवारांंनी शरद पवारांंचे पाच खासदार फोडावेत आणि केंद्रात मंत्रिपद मिळवावं, अशी भाजपची ऑफर असल्याचा दावा राऊतांनी केलाय..त्यावर राऊतांना आता महायुतीनं आपला प्रवक्ता म्हणून नेमल्याचा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी लगावलाय. 

संजय राऊतांच्या या दाव्यावर भाजप आणि राष्ट्रवादीने दिलेली प्रतिक्रिया पाहूया...

शरद पवारांच्या पक्षाचे खासदार अजित पवार किंवा भाजपसोबत का जाऊ शकतात, याची कारणं पाहुयात...

१) सरकारी यंत्रणाच्या धाडीपासून संरक्षण मिळेल

२) पाच वर्षं आमदार किंवा खासदारांना निधी मिळायला अडचण येणार नाही 

३) खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना जिल्हा बँक घोटाळ्यातून दिलासा मिळू शकेल 

४) बजरंग सोनवणे यांना साखर कारखाना प्रकरणी दिलासा मिळू शकेल 

५) सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद मिळू शकतं 

५) जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार,  या वरिष्ठ नेत्यांच सत्तेत योग्यरित्या समायोजन होऊ शकेल 

६) आगामी निवडणुकीत विधानसभेला झालेल्या पराभवाची कसर भरून काढता येईल 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram