Kokan 2022 : डोळ्याचं पारणं फेडणारं पालखी नृत्य, शंखासूर , खेळे सोंगं आणि पालखी : ABP Majha

Continues below advertisement

होळीचा उत्सव अवघ्या देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अर्थात प्रत्येक राज्या- राज्याच्या, प्रांता- प्रांताच्या प्रथा आणि परंपरा वेगळ्या आहेत. आणि या साऱ्यात ठळकपणे आपल्या समोर येतो तो कोकणातला शिमगोत्सव. इथले नमन खेळे असतील किंवा मग शांखासुर, गोमुचा नाच असेल किंवा मग आपल्यालाही थिरकायला लावणारं पालखी नृत्य. हे सारेच रंग आपल्यालाही देह भान हरपायला लावतात. कोकणच्या शिमाग्याचे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आजच्या या खास कार्यक्रमात. चला तर मग अभिनेता दिगंबर नाईक सोबत आपणही या कोकणच्या शिमग्याचा आनंद घेऊ या.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram