Kirit Somaiya Z Security: किरीट सोमय्या यांना Modi सरकारकडून Z दर्जाच्या सुरक्षेचं कवच

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून 40 CISF जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत. ही झेड दर्जाची सुरक्षा आहे. किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री, नेत्यांविरोधात मेहिम सुरु केल्यानंतर त्यांना धमक्या येऊ लागल्या होत्या. या धमक्यानंतर किरीट सोमय्या यांनी केंद्राकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. सोमय्यांची मागणी तात्काळ मान्य करत, त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली. आजपासून सोमय्यांभोवती केंद्राच्या जवानांचं सुरक्षेचं कडं असेल. तीन मिनिटांत कुठल्याही प्रसांगास सामोरं जाण्यासाठी सीआयएसएफ जवान सज्ज असतात. सोमय्यांच्या घराच्या बाजूलाच बॅरेक बनवून सुरक्षा रक्षकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola