Ramdev Baba : रामदेव बाबांनी अॅलोपॅथिक सायन्सबाबत चुकीची माहिती देणं हे गैर आहे : डॉ. शशांक जोशी
नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांवर केलेल्या अवमानजनक वक्तव्याचा निषेध केला आहे. राम कृष्ण यादव उर्फ स्वयंघोषित रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांबाबत जी अवमानजनक भाषा वापरली आहे त्याचा आम्ही निषेध करतो असं आएमए द्वारकाच्या वतीनं जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे.