Thackeray Dream Project : ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला शिंदेंकडून वाढीव निधी ABP Majha
एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचं गिफ्ट दिलंय... कॅबिनेट बैठकीत लोणार सरोवर संवर्धनासाठी ३७० कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आलीय... गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लोणार सरोवराला भेट देत येथील विकास आणि संवर्धनासाठी 200 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती... उद्धव ठाकरेंचा लोणार विकास हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आजच्या केबिनेटमध्ये निर्णय घेत लोणार संवर्धनासाठी उद्धव ठाकरेंपेक्षा 170 कोटी जास्त देत 370 कोटी रु देण्याची घोषणा केली आहे... आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतल्यानं एकप्रकारे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचं गिफ्टच दिल्याची चर्चा आता सुरु झालीय...
Tags :
Uddhav Thackeray Eknath Shinde Birthday Gift Cabinet Funds Lonar Sarovar Conservation 370 Crores Birthday Gift To Uddhav Thackeray