Maharashtra : Imtiyaz Jaleel यांच्या ऑफरनंतर राज्यात घमासान, नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

Continues below advertisement

Jayant Patil on MIM : एमआयएमला आधी आपण भाजप विरोधी आहोत, हे कृतीतून सिद्ध करावं लागेल, असं वक्तव्य जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी केलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी असल्याचं समोर आलं आहे. शरद पवारांपर्यंत निरोप पोहोचवा, अशी विनंती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केली आहे. त्यावरुन सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. 

जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी नेते जयंत पाटील म्हणाले की, "इम्तियाज जलील यांच्या मातोश्रींचं निधन झाल्यामुळं त्यांना भेटण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे गेले होते. अशावेळी राजकीय चर्चा करणं अभिप्रेत नाही. मला खात्री आहे, राजेश टोपे यांनी ती केलेली नसेल. त्यामुळे या चर्चेबाबत काही वक्तव्य करण्याची आवश्यकता वाटत नाही." 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram