Aaditya Thackeray : शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे आदित्य ठाकरेंचा दौरा लटकणार?

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील शिवसृष्टीच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे येणार कि नाही? यावरून आता विविध चर्चा रंगल्या असून संभ्रम देखील निर्माण झाला आहे. 29 मार्च रोजी दापोलीतील शिवसृष्टीचं उद्घाटन आदित्य ठाकरेंच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली होती. पण, केवळ दोनच दिवसांपूर्वी शिवसृष्टीचं उद्घाटन 26 मार्च रोजी पालकमंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी आघाडी तर्फे दिली आहे. त्यामुळे आता आदित्य यांच्या दौऱ्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शिवाय, शिवसेना असेल किंवा महाविकास आघाडी यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. नगरपंचायत निवडणुकीवेळी माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे आमदार पुत्र योगेश कदम यांना बाजुला सारलं होतं. त्यानंतर सारी जबाबदारी हि माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्या खांद्यावर दिली होती. अनिल परब यांच्या रिसॉर्ट प्रकरणात रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिप पुढे आल्यानंतर, व्हारयल झाल्यानंतर या साऱ्या घडामोडी घडल्या होत्या. त्यानंतर कदम पिता - पुत्रांच्या शिवसेनेतील राजकीय भविष्याबाबत चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आता केवळ दोनच महिन्यांमध्ये नवा वाद पुन्हा समोर आला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola