ST Worker Strike: मुंबईत एसटी संपाबाबत महत्वाची बैठक सुरू

Continues below advertisement

आजतरी एसटी संप मिटणार का, याकडे कर्मचाऱ्यांसोबतच राज्यातील सर्वसामान्य जनतेचंही लक्ष लागलंय. मागील जवळपास ३ आठवड्यांपासून लालपरीला ब्रेक लागलाय. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होतेय. आता याघडीला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबत एसटी कर्मचारी शिष्टमंडळ, भाजप आमदार पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची बैठक सुरु झालीए. जवळपास तासभरापासून खलबतं सुरु आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यासाठी  सरकारकडून काल अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव देण्यात आला. हा प्रस्ताव कर्मचारी शिष्टमंडळ मान्य करतं का हे पाहावं लागेल. तर तिकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतही आजच्या बैठकीला उपस्थित असून ते समन्वयकाची भूमिका बजावताहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram