Sachin Waze: अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरूनच पोलीस खात्यात येण्यासाठी अर्ज दिला, सचिन वाझेंचा दावा
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरूनच पुन्हा पोलीस खात्यात येण्यासाठी अर्ज दिला, असा दावा बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी केलाय. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगासमोर वाझे काल हजर झाले. तेव्हा वकिलांनी केलेल्या उलटतपासणीत वाझे यांनी ही माहिती दिली. नोकरीत पुन्हा येण्याआधी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना भेटलो होतो, अशी माहितीही वाझे यांनी दिलीय.