Hydrogen Car : देशातील पहिल्या हायड्रोजन कारमधून Nitin Gadkari संसदेत, प्रदूषण मुक्तीसाठी पर्याय
Continues below advertisement
Nitin Gadkari in Hydrogen Car : एकीकडे वाढतं प्रदूषण तसंच इंधनाचे वाढते भाव म्हणून इलेक्ट्रीक कार्सचा पर्याय आता समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध कार कंपनी टोयाटोने ग्रीन हायड्रोजनवर इंधनावर (Hydrogen based Fuel Cell Electric car) चालणारी भारतातील पहिली वहिली कार समोर आली होती. या मिराई (Toyota Mirai) कारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर आज संसदेत जाताना गडकरींनी याच कारने प्रवास केला. शुभ्र पांढऱ्या रंगाच्या या कारमधून गडकरींनी प्रवास केला असून महागलेल्या इंधनावर हायड्रोजन इंधनाचा पर्याय ठरेल, असा दावा गडकरींनी यावेळी केला. प्रदूषण नियंत्रणासाठी हायड्रोजन इंधन वापराच्या पर्यायाची पडताळणी करण्यासाठी गडकरींनी हा प्रवास केला.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Pollution Nitin Gadkari Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Hydrogen Car