#Corona कोरोना रुग्णांनी घरात उपचार घेताना काय काळजी घ्यावी? कोरोना संकटात नैराश्य कसं झटकायचं?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना झाल्यानंतर 14 दिवसांपर्यंत होम आयसोलेशन दिले जाते. मात्र कमी लक्षणे असल्याने या रुग्णांना 5 ते 7 दिवसांतच बरे वाटायला लागते, परंतु तरीही रुग्णांनी 14 दिवस कोणाच्याही संपर्कात येण्याचे टाळले पाहिजे. मात्र मला आता लक्षणे नाहीत, काहीच त्रास नाही. दमही लागत नाही आणि माझे ऑक्सिजन सॅच्युरेशन नॉर्मल असल्याचे कारणे देत मी बरा झाल्याचा आत्मविश्वास या रुग्णांमध्ये येतो. मग हे रुग्ण 5 ते 7 दिवसातच घराबाहेर पडत आहेत आणि तेच कोरोनाच्या सुपर स्प्रेडरची भूमिका निभावत आहेत. त्यातच मागील काही दिवसांमध्ये लहान मुलांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले आहे. या मुलांना लक्षणे तर दिसत नाहीत परंतु ते पॉसिटिव्ह आढळतात. विशेष म्हणजे घरातील एखादी व्यक्ती बाधित झाल्यानंतर मुलांची तपासणी केल्यास ही बाब समोर येते. या मुलांच्या माध्यमातूनही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.