Hingoli Tuljadevi Temple : मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहीत मंदिरातील सेवेकर्याने दिला जीव
Hingoli Tuljadevi Temple : हिंगोली जिल्ह्यातील घोटा ( देवी) येथील तुळजा देवी संस्थान मधील पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत जाचाला कंटाळून मंदिरातील सेवेकरी गजानन जगताप याने मुख्यमंत्र्याच्या नावे पत्र लिहीत आत्महत्या केली आहे मंदिर संस्थांमधील कार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे पदाचा गैरवापर करून मंदिरात कामे करतात आणि केवळ जातीय त्रास देतात या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचे पत्र जगताप यांनी लिहिला आहे.