ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 08 AM 28 August 2024 : Maharashtra News
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 08 AM 28 August 2024 : Maharashtra News
समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा, तात्पुरती सिमेंटची मलमपट्टी महिन्याभरात उखडली, सरकारच्या नोटिशीला कंत्राटदाराकडून केराची टोपली
शिवरायांच्या पुतळ्याच्या अपघाताविरोधात महाविकास आघाडी मैदानात, आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांच्यासह मविआचे नेते आज मालवणमध्ये
समुद्रावरील वाऱ्याचा नौदलाला अंदाज आला नसावा, मालवण पुतळा अपघात प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
मुंबई दहीहंडी फोडताना २३८ गोविंदा जखमी... सरकारी, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार, केईएममधील दोघांची प्रकृती गंभीर
राज ठाकरे आज बदलापुरात, प्रत्येक शाळेतील पालक आणि बदलापूरकरांशी संवाद साधणार
नितीन गडकरींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आणि नियोजनात सक्रिय राहावं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह, भाजप पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष
काही सुपारीबाजांनी मला पाडण्यासाठी सुपारी घेतले, नवनीत राणांनी बच्चू कडूंवर फोडलं पराभवाचं खापर
कोलकाता बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी आजही गोंधळाची शक्यता, विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलिसांच्या कारवाईविरोधात भाजपकडून आज १२ तासांच्या बंगाल बंदची हाक