Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 AM : 18 September 2024: ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 AM : 18 September 2024: ABP Majha
लालबागच्या राजाची मुंबईत भव्य मिरवणूक, बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी. सकाळी 8 वाजता होणार बाप्पाचं विसर्जन. .
पुण्यातील पहिल्या मानाच्या कसबा गणपतीचं विसर्जन, नटेश्वर घाटावर बाप्पाला निरोप.
पुण्यातील दुसऱ्या मानाच्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन, बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांची अलोट गर्दी.
पुण्यात मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीचं भक्तिमय वातावरणात विसर्जन, यावेळी गणेश भक्तांची मोठी गर्दी.
पुण्याचा मानाच्या चौथ्या गणपतीचं विसर्जन, तुळशीबाग गणपतीला पाताळेश्वर घाटावर गणेश भक्तांकडून निरोप.
पुण्यातील मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीचं विसर्जन, मोठ्या जल्लोषात वाजत-गाजत बाप्पाला दिला निरोप.
पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं थाटात विसर्जन, बाप्पासमोर ढोल-ताशासह पारंपरिक वाद्यांचं सादरीकरण.
कोल्हापुरात बंदी असताना बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत लेझरचा वापर, पोलिसांच्या सूचना मंडळांनी पाळल्या नाहीत.
आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, येत्या १५ ते २० दिवसांत आचारसंहिता लागेल, आणि महायुतीचाच विजय होईल, मंत्री गिरीश महाजनांना विश्वास.