Gunaratna Sadavarte : Aaditya Thackeray पुन्हा वरळीतून जिंकले तर मिश्या काढेन, सदावर्तेंचं आव्हान
abp majha web team
Updated at:
08 May 2024 07:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई: लोकसभा निवडणुकीचे राज्यातील तीन टप्पे पार पडल्यांनंतर आता विधानसभेचे पडघम वाजू लागल्याचं दिसतंय. राज्याच्या सहकार खात्याने अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचं एसटी बँकेचं संचालकपद रद्द केल्यानंतर सदावर्तेंनी आता थेट आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) आव्हान दिलंय. येणाऱ्या विधानसभेमध्ये मी आदित्य ठाकरे यांना चॅलेंज देतो, येणाऱ्या वरळी विधानसभेमध्ये त्यांनी डिपॉजिट जप्त करून दाखवावं. आदित्य ठाकरेंचं डिपॉजिट जप्त नाही केलं तर मी मिशा ठेवणार नाही असं थेट आव्हान अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी दिलंय.