Govind Shendge EXCUSIVE : महायुती सरकारला हिंदुत्वाचं वारसदार म्हणावं का? विहिंप : ABP Majha

Continues below advertisement

Govind Shendge  EXCUSIVE : महायुती सरकारला हिंदुत्वाचं वारसदार म्हणावं का? विहिंप : ABP Majha
भाजप शिवसेनेच्या राज्य सरकारला हिंदुत्वाचा वारसदार म्हणावं की नाही... हिंदुत्वाचा वारसा सांगणाऱ्या सरकारने वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी देण्याचा निर्णय करणे दुर्दैवी... हिंदू समाजाने हे केव्हा पर्यंत सहन करावे... वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर विश्व हिंदू परिषदेची राज्य सरकार बद्दल तीव्र नाराजी.. विहिंप नेते लवकरच राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणार.. संघानंतर आता विहिंप ही भाजपवर नाराज!  राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाने वक्फ बोर्डासाठी दहा कोटींचा निधी दिल्यामुळे विश्व हिंदू परिषदेने भाजप - शिवसेनेच्या हिंदुत्ववादाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत सरकार ने वक्फ बोर्डाला निधी देण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी केली आहे...  राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून हिंदुत्वचा वारसा घेऊन चालणारे सरकार जर अशी कारवाई करणार असेल, तर त्यांना हिंदुत्वाचे वारसदार म्हणावं की नाही म्हणावं असा प्रश्न जनतेसमोर निर्माण होत असल्याची तीव्र भावना विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र-गोवा प्रांत महामंत्री गोविंद शेंडे यांनी व्यक्त केली आहे...  शासनात योजना कोण बनवतो.. जो पक्ष सत्तेत असतो तोच योजना बनवतो, मग कोट्यवधी रुपयांची संपत्ती असलेल्या वक्फ बोर्डाला पैसे देण्याची गरज काय असा सवालही शेंडे यांनी विचारला आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram