#Unlock रेस्टॉरंट आणि मंदिरं मर्यादित क्षमतेने सुरू करण्याचा विचार, नियमावली बनवण्याचं काम सुरू
Continues below advertisement
मुंबई : राज्यात कोरोनामुळं बंद असलेली मंदिरं सुरु करण्यासंदर्भात गृह विभागाची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपासून बंद असलेली मंदिरं खुली करावीत यासाठी भाजप, वंचितसह काही संघटनांच्या आंदोलनानंतर सरकार मंदिरं खुली करण्याच्या तयारीत आहे. कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत झालेल्या चर्चेच्या आधारावर राज्य शासनाच्या गृह विभागाने तयारी सुरु केलीय.
राज्यातील महत्वाच्या देवस्थानांकडून मंदिरं खुली करण्यासंदर्भात आराखडा मागवण्याचा विचार असल्याची देखील माहिती आहे. शिर्डी साई संस्थान, सिद्धिविनायक मंदिर न्यास, पंढरपूर विठ्ठल मंदिर संस्थान अशा प्रत्येक देवस्थानांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार नियमावली बनवण्याचा प्रस्ताव आहे.
Continues below advertisement
Tags :
Saibaba Temple Temples Maharashtra Lockdown Shirdi Temple Shirdi Saibaba Shirdi Special Report Lockdown Temple Reopen